भारत मातेचा शोक
भारत मातेचा शोक
मी हाय तुमा साऱ्याची माय,
तुमी सारे माये लेकरं हाय.
मी यकतेची आशा तुमच्याकुन ठुयते,
पन जो तो दुसऱ्याचे जीव घ्याले उठते.
जठी नोट तठी गोठ अशी झाली रीत,
अरे कुठी गेली तुमची यकतेतली प्रित.
कामासाठी लावता लग्गा,
नाइ कोणी कोणाचा सग्गा.
कोणी जाइन पुढे त त्याचा मांगून वढता पाय,
अरे माणूसकी तुमी कोण्या बाजारात इकली की काय.
अरे माणसा तु काउन असा माणुसकीले भुल्ला,
अन् गीता सोडून डिस्कोमांगे चाल्ला.