STORYMIRROR

Ashwini Deshmukh

Romance

3  

Ashwini Deshmukh

Romance

कळत नाही आजकाल मी कुठे असते

कळत नाही आजकाल मी कुठे असते

1 min
17.8K


काही कळत नाही आजकाल मी कुठे असते,

कळत नाही का सारखी गालातच हसते.


सतत तुझ्या आठवणीत रमते,

प्रत्येक गोष्टीत तुलाच शोधते.


पहिल्यांदा स्वतःला बदलावंसं वाटतंय,

कोणासाठीतरी जगावंसं वाटतंय.


भविष्याच्या स्वप्नांमध्ये रमून जाणं अन् मग त्यात स्वतःला शोधणं या खेळाची एक वेगळीच गम्मत असते,

काही कळत नाही आजकाल मी कुठे असते.


कल्पनांचं एक सुंदर विश्व तयार झालंय,

त्यातच माझं मन रमायला लागलंय.


सतत कल्पना करते की तू माझ्या सोबत आहेस,

हातात तुझा हात आहे अन् कानावर तुझी प्रेमळ हाक आहे.


ह्या काल्पनिक विश्वात मी खूप खुश असते,

काही कळत नाही आजकाल मी कुठे असते.


कधी तू समोर असल्याचा भास तर कधी दूर गेल्याचा आभास,

मनाला सारखी तुझीच आस लागते.


आणि मग तुला शोधताना माझेच मन हरवते,

काही कळत नाही आजकाल मी कुठे असते.


तुझ्या आठवणींचे वारे झुळूक होऊन येतात,

अन् माझ्या मनाला भुरळ घालून जातात.


तुझे आभास सारखे माझ्या मनाला छळतात,

मग मी स्वतःशीच हसते, उगीच लाजते अन् डोळे बंद करून पुन्हा तुला आठवते.


काही कळत नाही आजकाल मी कुठे असते.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance