माझं प्रेम आजही तेच आहे
माझं प्रेम आजही तेच आहे
प्रेम माझं तुझ्यावर कालही खूप होतं,
अन् आजही तेच आहे.
माझ्या हातात कालही तुझाच हात होता,
अन् माझ्या स्वप्नात आजही तूच आहेस.
रिमझिम बरसणारा पाऊस कालही तोच होता,
अन् पावसात तुझ्याबरोबर भिजणारी मी आजही तीच आहे.
सोबत रंगवलेल्या भविष्याचे रंग कालही तेच होते,
डोळ्यातील अश्रू अन् चेहऱ्यावरील हास्य आजही तुझ्याचसाठी आहे.
डोळ्यासमोर चेहरा कालही तुझाच होता,
मनामध्ये पाऊलखुणा आजही तुझ्याच आहेत.
मिठीत मी तुझ्या कालही होते,
तुझ्या श्वासांची ऊब माझ्या आठवणींत आजही तशीच आहे.
ओठांवर माझ्या तुझ्या ओठांचा स्पर्श कालही होता,
मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात त्या सर्व आठवणी आजही तशाच आहेत.
माझा शोना तू कालही होता,
अन येडू माझा तू आजही आहेस.
माझ्या प्रेमाची किंमत तुला कालही नव्हती,
अन भावनांची कल्पना आजही नाही.
मात्र माझे प्रेम तुझ्यावर आजही तेच आहे...