STORYMIRROR

GANESH BADGUJAR

Tragedy

3  

GANESH BADGUJAR

Tragedy

अपघात

अपघात

1 min
14K


खूप प्यालेला घाबरत 

बडबडत एकजण 

पोहचला पोलीस स्टेशन 

म्हटला, 

'साहेब वाचवा मला, वाचवा मला 

अपघात झाला 

त्यात निरपराध मुलगा मेला' 

पोलीस खुर्ची वरून उठला 

रागाने लाल लाल झाला 

अपघात गुन्हामुक्ति साठी 

लाच देऊ केली 

पैशांची काळी बॅग

पोलीसाला दाखविली 

पोलीसाला भयंकर 

राग आला 

पण पैशे घेऊन मात्र 

खुशही झाला

अन् म्हटला,

'जा पुन्हा नको करू अपघात,

अन् कुठेच नको बोलू आपल्यातली ही बात' 

पोलीस गाडी 

अपघात स्थळी पोहचली 

पंचनामा भीतीने गर्दीही फाकली

पोलीस खूप रडला, खूप रडला 

लाचखोरीचा पश्चातापही झाला 

खूप रडला, खूप रडला

जेव्हा पाहिले निष्प्राण 

पडलेल्या त्या देहाला 

रक्ताने माखलेल्या 

स्वतःच्याच मुलाला 

रक्ताने माखलेल्या

 स्वतःच्याच मुलाला... 

   

   


Rate this content
Log in

More marathi poem from GANESH BADGUJAR

Similar marathi poem from Tragedy