STORYMIRROR

Ashish Parab

Tragedy

3  

Ashish Parab

Tragedy

फाशी

फाशी

1 min
14.3K


फाशीगेट उघडल्यावर

दोन उंच भिंतींच्या मधून जाताना,

फरफटत नेतात

निर्ढावलेल्या, क्रूरकर्मा, निर्दयी सैतानांना..!!


मृत्यूच्या कल्पनेनेच

थरकाप होतो त्यांचा..

सर्वांगातून उचंबळून येते

जगण्याची जबर इच्छा..


त्यांच्या रडण्याने आणि अक्रोशाने

दुभंगून जाते शांतता

कारागृहातली, कोठडीची अंधारापर्यंत..

पायाखालची फळी सरकताच

ते आचके देतात..

जमिनीचा ठाव घेण्यासाठी

पण..


प्रत्येक पापाचा हिशेब घेत

तो फास अधिकच घट्ट होतो.. कायमचाच

तितक्याच निर्दयपणे..!!

पण जेव्हा एक खराखुरा देशभक्त

सुळावर चढतो तेव्हा..


त्याच्या मुखावर नसतो भितीचा लवलेश

वा जगण्याची असक्तीही

असते फक्त एकच खंत

पुन्हा जन्मभूमीशी एकनिष्ठ

न राहता येण्याची..!!


त्याचे विचार मात्र शिल्लक राहतात

एखाद्या शिलालेखासारखे..

भावी काळात त्या विचारांचेच

होतात भाले आणि समशेरी

अन एक होऊन उठतात

अनेक मुठी,

राष्ट्राच्या आड येणार्यांसाठी !!


एक स्वार्थासाठी

जगायला तयार आहे..

दुसरा

मातृभूमीसाठी मरायलाही..



Rate this content
Log in

More marathi poem from Ashish Parab

Similar marathi poem from Tragedy