अंधःकार
अंधःकार
1 min
15.3K
मन्मनीच्या वळचणीला
साठून राहिलाय अंधःकार
दो हातांनी उपसूनही
शब्दांतून तो झिरपणार
रितेपणाला उधाण यावे
निमिषार्धात अष्टौप्रहार
आठवणींच्या काळोखात
दुःख भिनावे अपरंपार
किती चित्रीले हसरे क्षण
कितिक पाहिल्या रंगछटा
जे प्रारब्धी मुद्रित झाले
कसा त्यास द्यावा फाटा
दिवस असे उफराटे
की उरली नाही अभिलाषा
ध्यानस्थ गाभाऱ्यातून आता
तूच पहा रे परमेशा
