STORYMIRROR

Kamlesh Sonkusale

Romance Tragedy

3  

Kamlesh Sonkusale

Romance Tragedy

उरल्या त्या आठवणी

उरल्या त्या आठवणी

1 min
15.1K


गेले ते दिवस पहाटेचे,

तू दिसायची अंगणात,

तुझी काया शोधताना,

उरल्या त्या आठवणी हृदयात...



गेले ते दिवस सकाळचे,

तू दिसायची मंदिरात,

तुझी छाया शोधताना,

उरल्या त्या आठवणी हृदयात...



गेले ते दिवस सांजवेळचे,

तू दिसायची बागेत,

तुझी सावली शोधताना,

उरल्या त्या आठवणी हृदयात...



गेले ते दिवस रात्रींचे,

तू दिसायची स्वप्नात,

तुझी प्रतिमा शोधताना,

उरल्या त्या आठवणी हृदयात...



गेले ते दिवस प्रितीचे,

तू दिसायची हास्यात,

तुला विरहात शोधताना,

उरल्या त्या आठवणी हृदयात...



गेले ते दिवस कवितेचे,

तू दिसायची शब्दात,

तुला काव्यात शोधताना,

उरल्या त्या आठवणी हृदयात...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance