STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Tragedy

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Tragedy

दुबार पेरणीचं संकट

दुबार पेरणीचं संकट

1 min
14.6K


असा कसा पाऊस

मारली दडी पावसाने

पेरणी झाली पहिली

पाठ फिरवली पावसाने...१


दुबार पेरणीचं संकट

आला नशिबी भयाण

पडू दे गा देवा पाऊस

वाया जाईल रे बियाणं....२


निसर्गाचं चक्र कसं

फिरतंय उलट्या दिशेनं

त्रस्त झाला शेतकरी

फिरवली पाठ पावसानं....३


नको तेव्हा पाऊस

खूप खूप येतो

हाती आलेलं धान्य

धान्य नासवून जातो....४


पाहिजे तेव्हा पाऊस

आभाळाकडं पहायला लावतो

दुबार पेरणीचं संकट

शेतकऱ्याचं कंबरडं मोडतो...५


हात जोडून करतो विनवणी

भिजव माझं रानं

पाऊस दे गा देवा

अन् पिकवं माझं रान....६


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy