STORYMIRROR

Manish Vasekar

Tragedy

3  

Manish Vasekar

Tragedy

देवदूत

देवदूत

1 min
14.4K


खरंच का हो देश माझा

भारत आहे खूप खूप महान,

का मग अर्धीअधिक जनता

रोज उठते ओरडत भूक भूक अन तहान.


नारे खूप द्याल आपण

मेक इन इंडिया, इंडिया शायनिंग,

दिवसागणिक वधारतेय मात्र

रोगराई, भूकबळी स्केलची लायनिंग.


गरिबी हटाओ आणि शेतकरी कर्जमाफी

झालाय नुसता योजनांचा सुळसुळाट,

आहे मात्र पदरी जनतेच्या अन्

लाभार्थींच्या हातात फक्त खळखळाट.


आहे आम्ही भारतीय मात्र

बघतोय सरकारकडे आशाळभूत,

एक दिवस येईल खरंच

लोकनेते मग होतील देवदूत.




Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy