STORYMIRROR

Manish Vasekar

Inspirational

4  

Manish Vasekar

Inspirational

मुंबई

मुंबई

1 min
141

मुंबईतील एक स्पेशल खाज

रन फॉर नो कॉज

पैश्याला आहे फारच माज

अन खिशाला खणकता बाज


वेळेला तस महत्व किती

लोकल संगत जगण्याला गती

माणसाला मेंढर बनण्याची मती

चिरडून मरण्याची इथे कायम भीती

 

चाळी इथल्या फारच अरुंद

हवा आणि पाणी दोन्ही अशुद्ध

प्रकाशाचा किरण अगदीच मंद

अन चिमुरड्या खोलीत सगळेच विरुद्ध


मुंबईत झाली आता खूप दाटीवाटी

घराघरात जागेच्या रोजच्याच कटकटी

सगळ्यांच्या मनाला दुःखाच्या फटी

स्वप्नाळू जगण्यात मात्र कायम भरभराटी



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational