फुलं, गुलाबी
फुलं, गुलाबी
1 min
27K
फुलं तशीच, लाल गुलाबी
मृदु सुगंधी, मन मोहून टाकणारी,
कळीतून गुलाब होऊन
केसात माळल्यावर सौन्दर्य वाढवणारी.
फुलं तशीच, कोमेजून गेलेली
निवांत निपचित पहुडलेली,
श्रद्धांजली म्हणून समाधीवर वाहिलेली
दुर्लक्षित राहून स्मशानातच सडलेली.
फुलं तशीच, सुरेख कोमल
तरवारी पानांची अन देठ काटेरी,
जगण्यातील खाचखळगे बघून
यशपूर्तीचा खडतर प्रवास दर्शवणारी.
फुलं तशीच, गोड गुलाबी
गुलकंदासाठी खास जमवून ठेवलेली,
य़शस्वी प्रेमाने विड्यात गोडवा आणणारी
नकारात मात्र रक्ताळून पायाखाली चिरडलेली.
