समजदार
समजदार
1 min
231
नसेल कदाचित संसार
माझा सुखाचा,
धडा न दिला मात्र
मला संकटांना चपापण्याचा.
घोर अंधार असेल
खचितच वर्तमानाचा,
धगधगतोय मात्र काळजात
ज्वाला भरभराटीच्या भविष्याचा.
समज आहे मज मरणाने
संपेल प्रश्न कदाचित अंतरीचा,
माघारी पण अनंत अडचणी अन
भोग आहे मग माझ्याच कुटुंबाचा
झाडा सारखाच आहे मी
हा शेतकरी मराठी खरा,
असेल जरी का कर्जबाजारी
पण सुखासुखी मी न वठणारा…..
