STORYMIRROR

Manish Vasekar

Others

3  

Manish Vasekar

Others

भीम

भीम

1 min
28K


शूर मराठा बलभीम,

अन वीर निळा जयभीम,

धर्मवेडा अघोरी खेळ हा

पण तुम्ही पहा, छोटा भीम.


तीच पोरं, तेच नारे, तेच टिळे

झेंडेही तसेच, रंग फक्त निराळा,

व्देषा-व्देष आणि जातीभेदाच्या

पिंडाला शिवतही नाही येथे कावळा.


दगडफेक मग लाठीमार

जखमा अन खच पडतोय प्रेतांचा,

यातही आहे एक गोम

प्रश्न उरलाय फक्त बाजारू मतांचा.


प्रेम, करुणा अन बंधुभाव

यांचा आहे इथे कायमचाच दुष्काळ,

वाट पाहतोय अन मी मानव

धर्मनिरपेक्षतेची होईल, तरीही सकाळ.


Rate this content
Log in