STORYMIRROR

Manish Vasekar

Others

4  

Manish Vasekar

Others

म्हातारं खोड

म्हातारं खोड

1 min
456

मालकाने आणलेल वीस-नखी

गोंडस गुबगुबीत पिल्लू जेरी,

अन दहा वर्षाने मोत्या

झाला वाड्यात फुकट येरी

 

जेरीला आहे खास रतीब

भाकरी मास अन तंगडी

कोरभर भाकरीसाठी मोत्या

पण खेळतोय गावभर लंगडी

 

उकाड्यात लोळून बेंदाडात

मोत्याचा झालाय आता पुरता खार

कधीकाळी याच वाडयाखातर

खाल्ला होता त्यानं चोर-चिलटांचा मार

 

मोत्याचं पिल्लू असताना आणला

तेव्हा तो पण होता जाम क्युट गोड

टिकू देईना पण आता दारात कुणीच

झाल्यानं मोत्या खर्जुल म्हातारं खोड

 



Rate this content
Log in