जेवण
जेवण
1 min
460
जेवण आहे तेच सेम जेवण
लग्नाचं असो कि तेरवीचं जेवण
बारश्याला घुगऱ्याचं जेवण
वाढदिवसाला केक च जेवण
मुंजीला दान-धर्मा च जेवण
एकसष्टीला तुळा चे जेवण
ईदला शिरखुर्म्याच जेवण
वास्तूला शांतीच जेवण
होळीला पुरणाच जेवण
इमानदारीला मीठाच जेवण
जेवण आहे तेच सेम जेवण
पोळी भाजी भात वरण
मेल्याघरी पिठलंभाकरीच जेवण
नंतर तर दिवसाला आहेच गोड जेवण
गोडधोडासोबत पोळी भाजी भात वरण
समारंभ आणि कार्य नुसतच आहे एक कारण