कमान
कमान
सुख एक विचित्र बुडबुडा
त्याला दुःखाच्या तर कडा
पहाटेचा गोड गुलाब ही उमलून
जाईल की तिसऱ्याच प्रहरी कोमेजून
रंगातील सफेद स्वच्छ उजाळा
डागाळण्याच्या भ्रांतीने तो सावळा
शिखर सर करण्याची हाक
कायमच दाखवते दरीचा धाक
आजची लोभस मजा
उद्या होईलच की सजा
तारुण्यातील नटवे नखरे
वार्धक्यातील व्रण ते दुखरे
प्रत्येक यशाने आनंदून
अपयशही चकवेल दुखावून
कारण तर हे आयुष्यमान
फक्त एक कमान,
आलेखातील कमान
चढती-उतरती कमान