एक कळी न उमललेली..
एक कळी न उमललेली..


सारं काही माहीत असताना सुध्दा, तू एक चूक केली..!
हिशोब इथेच होणार आहे, हे नियती आधीच सांगून गेली..!
उमलण्याआधीच, तू नाजूक कळीला नष्ट केली..!
जाणून-बुजून लोभापायी, तू एक घोडचूक केली..!
काही उपयोग नाही आता, किती जरी सारवासारव केली..!
गुन्ह्
याला माफी नाही, असे तीच कळी बोलून गेली..!
एका निष्पाप जीवाला, तु पृथ्वीवर येण्याची दारे बंद केली..!
पण यामुळे तुझ्यासाठी सुद्धा, स्वर्गाची दारे आता बंद झाली..!
असे वाईट कृत्य करताना, तुला जराही कीव नाही आली..?
जन्मदात्री तुझीही एक कळीच होती, याची तुला आठवण नाही झाली..?