काजव्यांची सभा
काजव्यांची सभा
काल रात्री बागेत भरली काजव्यांची सभा,
रंगीबेरंगी झेंडूनीं केवळ गर्दी दाखविली तोबा..!
विषय होता सभे पुढे तो सूर्य बदलण्याचा,
अरे रोखता तरी येईल का कधी त्याची तेज आभा..?
एकातही नव्हती अन् नाही सूर्या सोबत खेटण्याची धग,
पण जो तो पुढे येऊन म्हणाला माझीच कशी चमक बघ..!
बोलण्या बोलण्यात कळले नाही सुटला जिभेवरचा ताबा,
पार्श्व भाग जाळून साऱ्यांनी वाढवली सभेची शोभा..!
जाण असून सभेत काही चंद्र-तारे हिरे ही गेले,
भाग मागचा जाळून त्यांनी तोंडही काळे केले..!
रात्र सरली सकाळ झाली तरी ठराव काही संमत झाला नाही,
पाय लावून पळाले सगळे म्हणत अब्बू आए भागो भाई..!
