STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Classics Fantasy

3  

Ganesh G Shivlad

Classics Fantasy

नाजुकशी

नाजुकशी

1 min
288

सुंदरशी... नाजुकशी...

शेवटी एक नाजूक वेलीचं ती..!


थोडीशी नाटकी, थोडी नखरेल..!

काहीशी हट्टी, पण भारी सजग..!


गुंतवून टाकत सर्वांना, 

एकत्र गुंतवून ठेवनारी..!


सर्वांना आपलसं करून,

आपणही गुंतून जाणारी..!


मनामनात खेळणारी…

अन् हळू हळू प्रेमाने,

वेठोळे ही घालनारी..!


ऊन अंगावर झेलून

थंड सावली देणारी..!


दुःख झाकुन टाकून,

हिरवं स्वप्न पांघरणारी..!


वाऱ्यासह झुलणारी,

पाऊसा सह खेळणारी..!


मायेच्या पदराखाली,

प्रेमाची ऊब देणारी…!


शेवटी एक नाजूक वेलीचं ती..!

तिलाही हवा असतो, 

एक सक्षम आधार..!

वाढवण्यासाठी संसार..!


पण तीच्यविना,

तो आधारही असतो,

निर्जीव, अपूर्ण 

अन् निराधार..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics