STORYMIRROR

Pandit Warade

Classics Others

3  

Pandit Warade

Classics Others

पंढरीची वारी

पंढरीची वारी

1 min
461

आली पंढरीची वारी

कुणा भाग्यवंता घरी

टाळ मृदंगाचा ताल

पुढे नाचे विणेकरी


भाळी अष्टगंध टीळा

शुभ्र वस्त्र अंगावरी

बुक्का अबीर गुलाल

उधळतो   वारकरी


"ज्ञानदेव  तुकाराम"

चाले नामघोष मुखी

संसाराच्या चक्रातून

याच दिवसात सुखी


पाय चालती चालती

चित्ती दर्शनाची आस

भूक, तहान,  हरली

'विठू भेट' हाच ध्यास


कुठे रिंगण सोहळा

कुठे नाम संकीर्तन

वर्ष भर चित्ता मध्ये

चाले वारीचे चिंतन


कुणी प्रार्थना करती

सेवा देवाची घडावी

देवा, पंढरीची वारी

माझ्या दारावर यावी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics