STORYMIRROR

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Classics

3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Classics

बाबा

बाबा

1 min
235

बाबा एक आभाळ

ओथंबून बरसणारं...

दुनियेच्या रखरखीत उन्हात

मायेचा शिडकावा देणारं...

बाबा असतो व्यापून

विश्व लेकराचं..

आतून हळवं हृदय

 जरी कवच काठिण्याचं..

न सांगता सवरता

करतो बरेच काही..

सोसतो अगणित चटके

पोरांच्या सुखापाई...

आईच्या मायेचे 

गोडवे जग गाई..

अगाध माया त्याची

सदा उपेक्षित राही.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics