ती
ती

1 min

600
महिला दिन साजरा करता
म्हणून ती दीन नाही
असली शक्तिस्वरूपा जरी
दमनाची तिला आस नाही
अन्नपूर्णा असली तरी
उपासानेही तृप्त राही
त्यागाचे धडे गिरवूनही
कधी मोक्षाची अपेक्षा नाही
वरतून भासे अवखळ परी
दया,क्षमा,शांती तिच्या ठायी
खळबळ जरी मनाच्या अंतरी
वरूनी थांग लागत नाही
कितीतरी वादळं पचवूनही
जणू तरारलेली कंच हिरवाई
तिच्याच मायेच्या सावलीत
सारं विश्वही विसावा घेई
प्रथापरंपरेच्या बेड्या पायी
तरीही नेटाने उभी राही
कर्तृत्वाला तिच्या मापण्याचे
यंत्र अजून हमखास नाही..