# माणूस म्हणून जगताना...!
# माणूस म्हणून जगताना...!
1 min
267
पाहिले चिमुकल्यास त्या ,भुकेपोटी रडतांना
थबकलो जरा इथे मी ,माणूस म्हणून जगताना
होऊनी लाचार अपंत्वाने ,दिसला तो भीक मागताना
हळहळलो जरा इथे मी ,माणूस म्हणून जगताना
हरवून बालपण त्याचे ,दिसला तो गाडी ओढतांना
थिजलो जरा इथे मी, माणूस म्हणून जगताना
कर्जाच्या ओझ्यापायी ,पाहिले त्यास जीव देतांना
थांबलो जरा इथे मी माणूस म्हणून जगताना
हसऱ्या मुग्ध कळ्यांचे ,पाहिले शीलहरण होतांना
हरलो जरा इथे मी, माणूस म्हणून जगताना
दिसले मज महामानव ते,या सर्वांस्तव झिजतांना
हसलो जरा इथे मी , माणूस म्हणून जगताना
