पावसाळा
पावसाळा
धरा तृषार्त तापली
आले आभाळ भरून
कृष्ण मेघ धावताती
आली वीज कडाडून
बरसती सरी सरी
धरा गंधित बावरी
डोलतात तृणांकुर
रम्य हिरव्या शिवारी
कंच ओली हिरवाई
नवा सृष्टीचा हा थाट
नवे सृजन अंकुरे
धरित्रीच्या गे गर्भात
भागे तृषा चातकाची
नाचे मोर थुई थुई
शोभे निळ्या आसमंती
इंद्रधनू छान बाई
सृष्टी जाहली सुस्नात
बघा वाहती ओहोळ
तिच्या लावण्य रूपाचे
मनी दाटती मोहोळ