STORYMIRROR

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Tragedy Others

3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Tragedy Others

लांबलेलं पाहुणपण..!

लांबलेलं पाहुणपण..!

1 min
159

तुझ्या वेळेत येण्याने सख्या, गेलो आनंदून फार

वाटलं येईल यंदा ,जीवनात नवी बहार...


बरसलास ना दोस्ता, जेव्हा सरींनी झरझर

घेतलं भरून श्वासात ,मृद्गंधाचं अत्तर...


येण्याने तुझ्या हरखली ,बघ माय धरणी

आनंदून बघ मीही, घेतली उरकून पेरणी...


सहवास दोन दिसांचा लेका, वाटला हवाहवासा

तुझ्या परतण्याचा मग, लागलो घेऊ कानोसा...


तुझ्या लांबल्या मुक्कामाचा ,झाला त्रागा फार

चहूकडे माजला बघ दोस्ता ,नुसता हाहा:कार...


पाहुणपण दोन दिवसांचं, बरं वाटतं दोस्ता

नको ना लावू दावायला, तुला घरचा रस्ता...


म्हणायला लागलं मन आता, दे ना थोडी उसंत

रोजचाच हा चिखल राडा नसतो कुणालाच पसंत...


तुझ्या भरभरून देण्याने,जरी भरली धरणं अन् तळी

माझ्या सुंदर स्वप्नांची मात्र,झाली दोस्ता राख रांगोळी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy