आवडता ऋतू
आवडता ऋतू
1 min
183
नाही पावसाची रिपरिप
नाही रणरणतं उन
आल्हाददायक वातावरणात
हवंहवंसं कोवळं उन
कधी वाटे बोचरी
तर कधी गुलाबी थंडी
हिरव्या भाज्या,हुरडा
साऱ्यांनी गजबजलेली मंडी
नाही सणांची लगबग
नाही कसली घाई
मस्त उबदार रजईत
निद्रेचे सुख आगळे बाई
मनभर मस्त खाणे
अन् मौजमजेचा मौसम
हिवाळ्यातच करतो मग
नव्या वर्षाला वेलकम
