STORYMIRROR

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Classics

3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Classics

कल्पना रम्य

कल्पना रम्य

1 min
216

स्वप्न साधेसे इवलेसे

वसे माझ्या मनी निरंतर

आपुल्या या वेड्या जगण्याने

व्हावे जगणे सहज नी सुंदर


चंद्र ,सूर्य ,तारे,नक्षत्र

रांगोळीत रेखावे सुंदर

बरसता खट्याळ जलदांनी

घ्यावे शिरी नभाचे छप्पर


मनमुराद भिर भिरावे

वाहत्या वायूच्या वारूवर

छेडता तारा जाणिवेच्या

उमटती सुखाचे झंकार


परिमळ गंधित फुलांचा

प्राशावा बनूनी भ्रमर

मधमाशी परी जगावे

ओतूनी मधुघट भारंभार


जपूनी मने सर्वांची

छेडावी जीवनाची सतार

सुंदर फुलवूनी पिसारा

बेधुंद नाचावा मनमोर



ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

More marathi poem from डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Similar marathi poem from Classics