STORYMIRROR

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Inspirational

3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Inspirational

अजूनही वेळ गेली नाही..!

अजूनही वेळ गेली नाही..!

1 min
205

समरसून जगण्याची कर एकदा घाई

अजूनही जगण्याची वेळ गेली नाही...


भरून घे श्वासात हा मुक्त रानवारा

रानभरी होण्याची अजुनी वेळ गेली नाही..


घे झेलून अंगावरती तुषार पर्जन्याचे

मयुरासम नाचण्याची अजुनी वेळ गेली नाही


ओतूनी भाव शब्दात फुलव तू गंधार आता

सप्तसुरात भिजण्याची अजुनी वेळ गेली नाही


पसरूनी पंख विस्तीर्ण उड उंच आकाशी

गगनभरारी घेण्याची अजुनी वेळ गेली नाही..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational