STORYMIRROR

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

#स्वप्न माझे जगावेगळे

#स्वप्न माझे जगावेगळे

1 min
143

हिरवा शालू समृद्धीचा.     

ल्यावा मी नववधू परी.

गर्द निळ्या जलरंगाची

असावी वर काचोळी..


फुले इवली साजावी 

कर्णफुले जणू कानात

बसाव्या जाऊनी तारका

गजरा बनुनी केसात...


कुंकू कपाळी शोभावे

पूर्वेच्या त्या लालीचे

रवी प्रभेने फाकावे

तेज मम कायेचे..…


गोड गुलाबी गाली

रंग चढे मावळतीचा

काळोखी चमकावी मी

नक्षत्र जणू आकशीचा.….


स्वप्न असे जरी जगावेगळे

पुरवी रे तू दयाघना

कुणी पुरवावी तुझ्याविना

माझी इतुकी कामना….


Rate this content
Log in