STORYMIRROR

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

पुस्तक

पुस्तक

1 min
155

ज्ञानाचे ते कोषागार

देती जगण्याला आधार...


दाविती दिशा जीवना नवी

नावीन्य देती जणू चैत्रपालवी...


नाही त्यांना जात अन् धर्म

सांगती तरी जगण्याचे मर्म....


सारे जरी सोडती हात

तेव्हाही पुस्तकं देती साथ....


पुस्तक अनुभवाची शिदोरी

देई बळ नवे मारण्या भरारी...


अत्र तत्र अन् सर्वत्र

पुस्तकासारखा नाही मित्र...


साहित्याला गुण द्या
लॉग इन