STORYMIRROR

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Classics

3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Classics

पाऊस सरी

पाऊस सरी

1 min
248

बरसती सरी सरी

या तप्त भूवरी

मोहरुन ही धरा

झाली गंध बावरी


उनाड वारा इथे

खेळ कसा रंगला

स्पर्श करी हळूवार

मम केश कुंतला


टपकती थेंब थेंब

झरे हळू पागोळी

साचल्या पाण्यावरी

रेखिली रे रांगोळी


पर्णातून ओघळे

वाजतो थेंब थेंब

पाणी जरी चहूकडे

धूसर ते प्रतिबिंब


बरसल्या पावसाचा

तोषवी थेंब थेंब

अंग ना ओले जरी

माझी मी चिंब चिंब


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics