STORYMIRROR

Kalpana Deshmukh

Classics

4  

Kalpana Deshmukh

Classics

माझा भारत महान

माझा भारत महान

1 min
361

तीन रंगी हा उंच तिरंगा डौलाने फडकतो

आम्ही भारतवासी गर्वाने अभिमान उरी बाळगतो ।।धृ।।


या भूमीच्या मातीमधुनी नररत्ने जन्मली

प्राणपणाने लढा देऊनी शहीद ती जाहली

धमन्यांमधुनी रक्त सळसळे भूरक्षीण्या सांडतो

आम्ही भारतवासी गर्वाने अभिमान ऊरी बाळगतो ।।१।।


उत्तुंग हिमालय, गडकिल्ले तर या देशाची शान

शिवा, तुका, निवृत्ती, ज्ञानोबा, व्यक्तीमत्त्वे महान

महापुरुषांच्या गाथा आम्ही एकमुखाने गातो

आम्ही भारतवासी गर्वाने अभिमान उरी बाळगतो ।।२।।


सर्वधर्मसमभाव ही शिकवण जगताला दिधली

माणुसकी आणि बंधुत्वाची माळा गुंफियली

भिन्न वेश, भाषा, पंथ तरी एकात्मता साधतो

आम्ही भारतवासी गर्वाने अभिमान उरी बाळगतो ।।३।।


साऊ, जिजाऊ, राणी लक्ष्मी या तर रणरागिणी

वातीसम झिजूनी झळकले नाव उंच गगनी

कीर्तिवंत या महा विदुषी, इतिहास हे सांगतो

आम्ही भारतवासी गर्वाने अभिमान उरी बाळगतो ।।४।।


भारतात मम मोती कणसे शिवारात डोलती

शेतकरी राजा अन पाखरे सुगी गीत गाती

गंगा, गोदा, कृष्णा नद्यांचे पूजन आम्ही करतो

आम्ही भारतवासी गर्वाने अभिमान उरी बाळगतो ।।५ ।।


तीन रंगी हा उंच तिरंगा डौलाने फडकतो

आम्ही भारतवासी गर्वाने अभिमान उरी बाळगतो ।।धृ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics