STORYMIRROR

Deepti Naykodi

Others

4  

Deepti Naykodi

Others

आज खूप दिवसांनी लिहावसं वाटलं...

आज खूप दिवसांनी लिहावसं वाटलं...

1 min
606

आज खूप दिवसांनी काहीतरी लिहावसं वाटलं.

स्वतःच स्वतःशी जरा बोलावसं वाटलं.


थोडं थांबावं, बसावं, विसावसं वाटलं.

स्वतःच स्वतःशी जरा बोलावसं वाटलं.


रोजच्या धावपळीच्या, गर्दीच्या जगात जरा एकटं राहावसं वाटलं.

स्वतःच स्वतःशी जरा बोलावसं वाटलं.


मी ही तीच, माझे बोलणेही तेच पण जग मात्र बदलेलं वाटलं.

मग मी ही स्वतःला बदलावं असं क्षणभर वाटलं.


बदल ही काळाची गरज आहे असं म्हटलं जातं.

मग मी ही स्वतःला बदलावं असं ठरवून टाकलं.


हा समजून, उमजून केलेला बदल, खरंच करणं गरजेचं आहे का असं कुठेतरी वाटलं.

पण मग माझ्यातल्या मीला तर मी हरवून बसणार नाही ना असं सतत वाटत राहिलं.


आज खूप दिवसांनी स्वतःच स्वतःशी जरा बोलावसं वाटलं...


Rate this content
Log in