Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rakesh More

Classics Others Romance

4.5  

Rakesh More

Classics Others Romance

तुझ्या नजरेतील प्रेम

तुझ्या नजरेतील प्रेम

1 min
324


तुझ्या नजरेतील प्रेम

झरा बनून खळखळताना

मी पाहिलंय तुला माझ्याकडे

सखे चोरून बघताना


तू मान अथवा नको मानू

माझा विचार तू करतेस

जर प्रेम करतेस माझ्यावर

मग मागे का सरतेस

कधी करशील का विचार माझा

मागे अशी सरताना

मी पाहिलंय तुला माझ्याकडे

सखे चोरून बघताना


प्रत्येक क्षणी माझ्या मनात

फक्त एक तूच असतेस

नजरेला नजर मिळताच

अशी का स्मित हसतेस

काळीजंच चिरून जातेस

अशी स्मित तू हसताना

मी पाहिलंय तुला माझ्याकडे

सखे चोरून बघताना


तुझ्याशिवाय माझं कशात

मनंच आता लागत नाही

फरक इतकाच आहे की

मी हे तुला सांगत नाही

हृदयातील धडधड वाढतेय

भावना शब्दात बसताना

मी पाहिलंय तुला माझ्याकडे

सखे चोरून बघताना


दोन गोळे लोण्याचे

वितळून जसे एक व्हावे

दोन हृदय एक होऊन

एकाच ठोक्यांवर धडधडावे

कळलंच नाही मला आपलं

हृदय प्रेमात फसताना

मी पाहिलंय तुला माझ्याकडे

सखे चोरून बघताना


शब्दाने तू नको बोलू

नजर तुझी सांगून गेली

भावना तुझ्या अंतरीच्या

अलगद शब्दात मांडून गेली

शब्द गुंफून कविता झाली

ध्यानीमनी नसताना

मी पाहिलंय तुला माझ्याकडे

सखे चोरून बघताना


अचानक काही घडून जातं

मन कोरी पाटी असतं

हृदयाच्या ह्या घरामध्ये

अलगद कोणी येऊन वसतं

जाणीवही झाली नाही मला

हृदयात तू वसताना

मी पाहिलंय तुला माझ्याकडे

सखे चोरून बघताना


कधीतरी भावना तुझ्या

शब्दात तरी मांडून बघ

प्रेमाच्या या निर्मळ जगात

हृदय जरा सांडून बघ

प्रेमाचे हे जगही वाटे

अनोळखी तू नसताना

मी पाहिलंय तुला माझ्याकडे

सखे चोरून बघताना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics