STORYMIRROR

Harshada Wakchaure

Romance Classics

4  

Harshada Wakchaure

Romance Classics

राधा

राधा

1 min
468

पावसाची सर आता,

नुकतीच बरसली...

आणि प्रेमाची हिरवळ

पुन्हा एकदा मनात खुलली...

नटखट कृष्ण तू माझा,

मी तुझी बावरी राधा...


काय रे कृष्णा वाजवतोस,

बासरी माझ्या नावा!

विचारते तर नुसतं म्हणतो,

राधा राधा...

एवढा काय तुला सुरांचा वेडावा,

आठवणीत राहू दे कन्हैया..

माझ्यामुळेच आहे सुरांच्या,

मैफलित मेळावा...

नटखट कृष्ण तू माझा,

मी तुझी बावरी राधा...


पुकारतो बासरीतून मला,

तिचा आवाज ऐकताच!!

जीव माझा होतो वेडा-खुळा,

विचारलं तर सांगतो,

प्रेम फायद्यासाठी नाही करायचं!

नेहमी विवाहाबद्दल हेच सांगतो,

विवाहासाठी दोन जीव लागतात...

आपण तर एक आहोत,

मग! कसला गं आपल्यात दुरावा..

नटखट कृष्ण तू माझा,

मी तुझी बावरी राधा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance