STORYMIRROR

Harshada Wakchaure

Romance

3  

Harshada Wakchaure

Romance

प्रेम

प्रेम

1 min
119

अधीर मन झाले भेटीस

वाटतो काळ खुप उलटला ,

का करते नियती चेष्ठा माझी

जीव प्रेमाच्या नात्यात गुंतला...


सोडुन चालले एक एक नाते

दूर झालेत सर्वाची हसरी मने ,

आस आजही लागते भेटीची

गैरसमज दूर करुन विसरावे उणे...


स्वप्नांचे दार बंद झाले आज

का मनाला काहीच उमजेना ,

सोडुन साथ आपल्या माणसांची

अर्थ जगण्याचा कोणाला समजेना...


कितीतरी शोधत फिरतोय 

एकही निस्वार्थी प्रेमी गावेना ,

हरता - हरता हसतोय रोज

वाट काय एकदाची दावेना...


अधीर झाले मन आता माझे

व्हाव्या या शेवटच्या भेटीगाठी ,

गेलो जरी सोडुन अर्ध्यात तुला

नाव असुदे कायम तुझ्या ओठी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance