STORYMIRROR

Harshada Wakchaure

Others

3  

Harshada Wakchaure

Others

प्रेम

प्रेम

1 min
181

अश्रूविना आज अलगद 

डोळ्यांच्या पापण्या ओलावल्या,

सुखाच्या सरी बेधुंद बरसल्या 

मिळालेल्या आनंदात समाधान मानले, 

सोबतीने तुझ्या रंग हे फुलले.

आल्या सरीवर सरी, 

अंग आेलेचिंब झाले.

सोहळा सुखाच्या सरींचा ,

मन त्यात चिंब चिंब भिजले.

भुरळ घालते मनाला, 

अंगाला झोंबणारी गार हवा.

सोबतीने तुझ्या बहरल्या 

सुखाच्या वाटा,

भरू दे प्रेमाच्या घागरी,

बसरत राहो अशीच 

सरीवर सरी,

सुखाच्या सरी... 


Rate this content
Log in