STORYMIRROR

Harshada Wakchaure

Others

3  

Harshada Wakchaure

Others

प्रेम

प्रेम

1 min
208

आज या भाबड्या शब्दांना 

एक जिवंतपणा आला |

पहिल्यासारखा डोळस प्रेमाचा

सौम्य असा गंध आला ||


माझ्या डोळ्यात तू ,

तुझ्या डोळ्यात मी ,

अगदी तसाच दिसतो आहे |

हात जरी थकले असतील ,

पण त्या मधील ऊब तशीच 

आहे ||


सगळे काही विसरून जाऊ ,

सगळे काही विसरून जाऊ |

एकमेकांना नुसतं बघत राहू ,

रूसवे-फुगवे ते नंतर पाहू ||


राञ ही मंतारलेली अजून ,

तशीच तरूण आहे |

आपण पुढे सरलो तरी,

आपल्या प्रेमाला ती धरून आहे|| 


आता माझ्यामध्ये तू ,

तुझ्यामध्ये मीच दिसतो आहे|

आयुष्य माझं तू ,

मी प्रवास..तुझ्यामधेच हिंडत आहे,

तुझ्यामधेच हिंडत आहे....


Rate this content
Log in