STORYMIRROR

Harshada Wakchaure

Abstract

4  

Harshada Wakchaure

Abstract

फक्त चमचा

फक्त चमचा

1 min
288

स्वतःस नोकर कुठे मानतो आहे चमचा?

पातेल्यावर हक्क सांगतो आहे चमचा...


सहजासहजी माणूस हल्ली भेटत नाही

गल्लोगल्ली सहज भेटतो आहे चमचा


ताठ कण्याचे आपण सगळे मागे पडलो

किती गतीने पुढे सरकतो आहे चमचा


रस्सासुद्धा मला भेटला नाही तेथे

तोंड पाहून खांड वाढतो आहे चमचा...


स्तुती ऐकून नको फारसा हुरळू मित्रा...

झाडावरती तुला चढवतो आहे चमचा


कामासाठी त्यास ठेवले होते ज्यांनी

आता त्यांना काम सांगतो आहे चमचा


कलियुग नाही, नक्की असेल हे चमचायुग...

हल्ली येथे फार चमकतो आहे चमचा


कधीच पंगा नकोस घेऊ तू त्याच्याशी...

भल्या भल्यांची वाट लावतो आहे चमचा


हात स्वतःचे असून मी का हतबल होऊ?

म्हणून आधी दूर लोटतो आहे चमचा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract