Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Harshada Wakchaure

Others

3  

Harshada Wakchaure

Others

गंध मैत्रीचा

गंध मैत्रीचा

1 min
185


गंध मैत्रीचा भिनला

जीवनात अंतरंगी

श्वास बनला खरचं

मैत्री आहे बहुरंगी....||१||


क्षण असो कोणताही

गंध मैत्रीचा दरवळी

वाटेकरी भावनांचा

मित्र असतो जवळी....||२||


येता ते रडवणारे

दुःखी कष्टी कधी क्षण

हात देत खांद्यावर

मित्र धावी विलक्षण....||३||


होई सुखात आनंदी

तुझे माझे नसे तिथे

एकरूप जग असे

गंध मैत्रीचा रे जिथे....||४||


नसे हेवा आणि द्वेष

फक्त आपुलकी मनी

समजून घेण्यासाठी

बन मैत्रीचा व्यसनी....||५||


गंध मैत्रीचा जगात

आनी चैतन्य अपार

जप मैत्रीभाव सदा

सुख बघ वाढणार ....||६||


Rate this content
Log in