STORYMIRROR

Harshada Wakchaure

Others

3  

Harshada Wakchaure

Others

प्रेम

प्रेम

1 min
255

दर्पणात मी मला न्याहाळते,

वेडे खुळे नखरे करून

मनसोक्त हसते

स्वतः च्या प्रेमात देखील पडते.

 या दर्पणासोबत.

मनमुराद आनंद लुटते.

कधी लट गालावर ओढून बघते..

कधी लाजून गालातल्या खळी पाडते. तर कधी...

दर्पणात मी नाक चिमटीत पकडू बघू पाहते.

दर्पणाशी पारदर्शकत संवाद साधते.

मनातले गुपित हळूच फोडते दर्पणाला एक चांगला मिञ संबोधते .

मी दर्पणात आणि दर्पण ही मलाच बघत

निसर्गाने बनवलेली ही वस्तूच निराळी

व्यक्तिची आंतरिक छबी

अतिशय सहजतेने दाखवते.

नात्यातही पारदर्शकता हवी तरच नातं फुलतं हे शिकवते



Rate this content
Log in