STORYMIRROR

Harshada Wakchaure

Others

4  

Harshada Wakchaure

Others

बालमन

बालमन

1 min
387

आई बाबा

ऐकताय का?

खेळू द्या ना मला..

किती घेताय अभ्यास...?

तुमच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली..

माझा गुदमरतोय श्वास...

शाळा झाली की ट्यूशन..

देताय सर्वजण टेन्शन..

मी मूल आहे की यंत्र?

का छळताय अहोरात्र..?

मला हवे ते खायचेय..

फुलासारखे फुलायचेय..

वार्‍यावरती डोलायचेय..

आणि मातीत लोळायचेय...

पण तुम्ही कांहीच करू देत नाही..

अभ्यास एके अभ्यास..!!

ऐकू तरी कोणाचे..

ओझे माझ्या मानेवर...

तुमच्या भरगच्च अपेक्षांचे..

पेलवत नाही मला..

मानवत नाही तुम्हाला...

शेजारच्या मुलासारखेच..

तुला घडवायचेय आम्हाला...

म्हणताय, फी भरलीय भाराभर..

मेरिट मध्ये आले पाहिजे...

पण तुम्हीच सांगा पैशाने...

बुद्धी विकत घेता येते..?

आई बाबा ऐका ना...

एवढेच करा आता..

मला संस्कारक्षम घडवा...

सत्य मार्ग दाखवा....

मी कष्ट करेन खूप..

देईन तुम्हाला सुख...

तुमच्या म्हातारपणी...          

आधाराची काठी होईन..

आणि वेळ पडलीच तर..

मी तुमचा आईबाबा होईन...

एवढ्याच ठेवा अपेक्षा..

मग होणार नाही उपेक्षा...!!


Rate this content
Log in