अग बाई...!
अग बाई...!
अग बाई....!
अग बाई सावकाश
पिंन टोचल मला
किती सांगायचं
गजरा नको मला....!
असू दे ग बाई
जरा आवरून सावरून रहा
किती छान दिसतो
तूच पहा जरा...!
पुरे बाई तुझं
काहीतरीच असतं..!
या वयाला सांग
काय हे शोभत...?
अग झालं झालं
हलू नको आता
पिन लागेल ग बाई
तुझ्या नादात माझ्या हाता....!

