परत नव्याने जीवन जगणे शिकवून जातो..
परत नव्याने जीवन जगणे शिकवून जातो..
तू आनंदी असता मन प्रफुल्लित होते..
तू नाराज असता सारंच काही नीरस भासते..
सदैव तुझा प्रफुल्लित आवाज ऐकावासा वाटतो..
ऐकून आवाज वेगळाच आनंद माझ्या उरात दाटतो..
तुझं हॅलो ऐकायला दिवसभर कान माझे आतुर असतात..
फोनची रिंग वाजताच ते अगदी सावध होऊन जातात..
हृदयाचे ठोके जणू धावत सुटतात..
फोन सुटू नये म्हणून जोर जोरात पळतात..
शेवटी उचलला जातो फोन..
मग माहित नसतं दुसरं बाजूला आहे तरी कोण..
तुझं बिन्धास्त बोलणं ऐकून मन अगदी प्रसन्न होऊन जातं..
दुसऱ्या दिवशीपर्यंत वाट बघायची हिंमत देऊन जातं..
तुझ्या आठवणीत दिवस अगदी आनंदात जातो..
परत नव्याने जीवन जगणे शिकवून जातो..