योग नात्यांचा
योग नात्यांचा
जन्माआधीच जुळली असतात नाती आपली..
आपल्याला वाटतं आपली भेट योगायोगाने झाली..
सारंच काही विधिलिखित असतं..
आपल्याला फक्त ते माहिती नसतं..
साथ ज्यांची लिहिली असते सदैव..
आड येत नाही त्यांच्या कधीही दैव..
किती ही अडचणी येऊ द्या किंवा अडथळे..
जिथे जुळायची तिथेच नाती सदैव जुळे..
मान्य करावे अथवा नाही काही ही मला कळत नाही...
मात्र सारं काही ठरलं असतं यात काही ही शंका नाही...
color: transparent;">जन्मोजन्माची साथच असावी जणू आपली काही..
कधीही अनोळखी असं मला काहीही भासलं नाही...
अत्यंत रममाण झालेय तुझ्यात मी..
तुझ्याशिवाय क्षणभरही जगू शकायचे नाही मी..
सारेच काही जणू तुझ्यात सामावले...
मला जगच तुझ्यात विलीन झाल्याचे भासले...
तू आहेस तिथेच माझे जग आहे..
तुझ्याशिवाय स्वर्ग ही अपूर्ण आहे..
सदैव सान्निध्यात तुझ्या राहायचे मला..
हीच प्रार्थना आहे माझी वारंवार देवाला...