आजी...
आजी...
आजी या शब्दातच आई आणि जीवन सामावलं आहे..
आईचे प्रेम आणि जीवनाचे सार जणू आजीनेच शिकवले आहे..
लहापणापासून सदैव आम्हावर माया तिची बरसत होती..
आजीच्या सान्निध्यात सारी नातवंडं खेळत होती..
सदैव नीटनेटके राहणे तिला फार आवडायचे..
नव्वार पातळ तिला शोभून दिसायचे..
अगदी स्वच्छंद आनंदी जीवन जगायची..
काम करायला सदैव तत्पर असायची..
e="background-color: transparent;">आज आजीने सारं काही त्याग केलंय..
देवाघरी जाऊन आम्हाला एकटं पाडलंय..
इतकी घाई का केलीस गं आजी तू जायची..
तुला आठवण पण नाही आली का आमची..
तू जिथे असशील तिथे सदैव आनंदी राहा..
आमच्यावर आपली माया आणि आशीर्वाद सदैव बरसत राहा..
सांसारिक मोह मायेतून तुला मुक्ती लाभावी..
तू विष्णू लोकात वैकुंठवासी व्हावी..