आज कित्येक दिवसांनी जाणवले..
आज कित्येक दिवसांनी जाणवले..
आज कित्येक दिवसांनी जाणवले..
अगदी स्वच्छंद आपण भाष्य केले..
मनातले सारे काही जणू आपणच ओठांवर आले..
जुने काय नवे काय सारेच कसे एकरूप झाले..
आज कित्येक दिवसांनी जाणवले..
आज कित्येक दिवसांनी जाणवले की किती सुंदर असतात हे क्षण..
जिथे आपण समोर नसूनही जपतो एकमेकांचं मन..
आज कित्येक दिवसांनी जाणवले की आठवणी इतक्या महत्वाच्या का असतात
..
सारंच काही नश्वर आहे मात्र आठवणीच चिरकाळ टिकतात..
आज अचानक जाणवले की जीवनात आपलं कोणीतरी सोबती का असावं..
आपल्या मनातलं जे काही आहे ते सर्वप्रथम त्यालाच कळावं...
आज अचानक जाणवले की साथीदार कोणाला म्हणावं..
जो सदैव आपल्या सोबत असतो त्यालाच साथीदार म्हणावं..
आज अचानक जाणवले की जोडीदार कोणाला म्हणावं..
ज्याच्यावर आपलं जिवापार प्रेम आणि विश्वास आहे त्यालाच जोडीदार म्हणावं..