मी, मी न राहता तुझ्यात हरवून जाते
मी, मी न राहता तुझ्यात हरवून जाते
आवाज ऐकताच जणू भान हरपून जाते..
शब्द ही अपुरे पडतात सारेच विसरून जाते..
बोलायचं असतं तुझ्याशी खूप काही..
पण वेळेवर काहीही मला सुचत नाही..
जणू तुझ्याशी बोलताना मंत्रमुग्ध होऊन जाते..
काय परत बोलावे याचे भानही विसरून जाते..
सारे जगच जणू तुझ्यात सामावून जाते...
मी, मी न राहता तुझ्यात हरवून जाते..

