माय मराठी
माय मराठी
1 min
292
मराठी भाषा जणू अमृताचा झरा..
अस्सल मराठी बोली वेड लावी उरा..
काळजाची धडधड अन् जीवनाची सारथी..
मराठी मायबोली असे सदैव आमची साथी..
महती न्यारी आमच्या मराठी मायबोलीची..
इतकी गोडी आहे मराठीत जितकी नाही कोणत्या भाषेची..
सहज लयदार आणि वळणदार आहे मराठी..
जसं वळण द्याल तशी वळते मराठी..
महाराष्ट्राची आण बाण शान आहे मराठी ..
साऱ्या महाराष्ट्रवासियांची प्राण आहे मराठी..