गरीबाच नशीब
गरीबाच नशीब
पोटाला चिमटा येईल आमच्या, नकोय अस जगण
नकोय तापाच्या अंगाला रात्रभर, औषधांसाठी रडणं
नकोय तो आजार जो घराच्या खांबाला हलवेल
चार घास कमी खाऊ ,ते आम्हाला परवडेल
काय खाणार आम्ही ,जर पैशे नसतील घरात
त्यांचं काय होईल ,जे उधारीवर जगतात
अंगाला येतोय वास कारण पाणी नाहीये नळाला
फाटलेत सर्व कपडे आता काय घालणार सणाला
अंधारात काढतोय दिवस कारण फुटलेत काचेचे दिवे
इतकी लायकी नाही आमची, की कपडे घेऊ नवे
आई करते घरकाम आणि बापुस डुबलाय कर्जात
एकवेळेच्या जेवणाची भाकर ,नेहमीच नसते ताटात
कधीच सांगत नाय जरी, दुखत असतील पाय
शांत आवाजात विचारतात ,बाबू झोपला की नाय
अंगाला आहे का ताप? ,अशी ताई तिला विचारे
चुलीजवळ बसले होते ,अशी समजूत आई काढे
राशनवर जगणारे आम्ही ,आम्हाला मौज नाही माहित
जखमेवरच्या मलमला सुद्धा, पैसे खिशात नाहीत